Posts

Showing posts from 2011
स्वप्न मनातले ......! शब्दांचे शब्दांशी,  बहरलेल्या  फुलांशी,    हरेक त्या नात्याशी,   हळव्या त्या मनाशी,   हरवलेल्या  क्षणाशी,  जपलेल्या त्या नात्याशी,  हरेक त्या आठवणीशी,   स्वप्न मनातल प्रत्येकाने   स्वतःचे स्वतःशी बांधलेलं  एक अतूट बंधाचे... स्वप्न मनातले !!!!!   

थोडास थांब बघतर मागे वळून,

Image
थोडासा थांब बघतर मागे वळून, कुठेपर्यंत आले आहे मी..., तुझ्या सोबत तुझ्या नकळत, थोडासा थांब बघतर जरा...! हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे, रात्रदिवस थकलेत् रे ते..., त्याना एकदा अलगद, तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा, थोडासा थांब बघतर जरा...! तुझ्या नसन्याने तुझ्या, असण्याचे महत्व कळला आहे मला, तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा, थोडासा थांब बघतर जरा...! तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व, सगळ सगळ मान्य मला, पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय, ते बघून तर जा जरा..., थोडासा थांब बघतर जरा,,,,,,,,,,!  वर्षा पालकर  ०९.११.२०११

"एकटीच माझी मी..!

Image
मी अशीच असते , कधीकधी एकटीच माझी मी हरवलेली  , गर्दीत भोवतीच्या, कुणीच नसत कधी ..., येथे न कोणी राहिले, ओळखीचे अन न पाळखीचे, होतात भास मजला, असेच कधीकधी ..., जपते मनात माझ्या, असे हुंदके कधी कधी , लपवीत आसवे  ही हसते कधी कधी ..., असच कधी मी हरवुन बसले माझीच मला मी  आता नकोनकोशी वाटते माझीच मला मी …  जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरीही, उसवीत  खुणा  आठवते आज ही मला माझी मी ....! वर्षा पालकर  २१.१०.२०११

ती राधा बावरी....!

Image
काल तुझी आठवण नव्याने  खुलवून गेली,  माझ्या जगण्याला नवा आधार देवून गेली,  तुझ्या परतीच्या वाटेवर जणू,  प्राजक्ता बहरून गेली..., आज ही आठवतोय  मला,  आपल्या भेटीतला हरेक तो क्षण, अनोळखी रस्ते आणि अनोळखी आपण  तरी हि का वाटे एकमेकांची ओढ..,  तीच ती संध्याकाळ अन तीच ती रातराणी,  आज जणू ती नव्याने आली माझ्या दारी,  अंगणात नाचली सर्वत्र पसरली अन.  परत तेच परिमल  सोडून गेली माझ्या घरी, आज ही आहे त्या आठवणी संगतीला,  परत परत नव्याने जगायला लावायला,  तोही  कृष्ण सावळा अन मी ही राधा बावरी,  त्या नात्याला अंत न कधी जाहला.....!     वर्षा पालकर  २६.०७.११

स्वप्नाची दुनिया....सुंदर अन सुखद

Image
स्वप्नात येऊन हळूच डोळ्यांत दडून जा.., मी साद घालते तुला तू माझ्यात विरून जा..! वाटलं स्वप्नांवर लिहावं काहीतरी, पण स्वप्नात त्याच्या शिवाय कुणीच नाही..., स्वप्नं त्याचे नयन माझे मन माझे घर त्याचे..,   त्याची अशी सुंदर कल्पना..,  अस्पष्ट चेहरा, अन शांत सोबतीला  कोण आहे तो...? माहित नाही मला,  पण नेहमीच असतो सोबतीला,अन  स्वप्नान मधल्या एकांताला ..!  स्वप्नामध्ये तो मला फार आवडतो ,   त्याचा सहवास हवाहवासा वाटतो , तो क्षणात दिपतो  अन क्षणात विझतो ,   अस का वागतो तो...?  प्रश्न पडतो मग माझ्या मनाला..,  कळत नव्हते मजला  , काय झाले त्याला,  स्वप्नात येऊन म्हणाला मला.., सांग ना ? ग.. आवडतो का मी तुला..? मनाने होकार दिला,   ओठांची कुजबुज झाली,   नकळत  कोवळे उन डोळ्यांवर पडले, डोळ्यांची उघडझाप झाली अन.., स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडले अन,  वास्तवाच्या उजेडात  एकवटून  गे...

कारण....,तेव्हा तो माझ्या जीवनात आलाच नव्हता..!

Image
तेव्हा ही होताच की  गार पावसाळा..., रिमझिमनाऱ्या सरीचा अन, कोसळणाऱ्या धबधब्याचा..,! पण त्यातली  निशब्दता,  कधी  जाणवलीच नव्हती ..,  कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच  नव्हतास..! तेव्हा ही होतच होती की , रोज संध्याकाळ..,  रुपेरी किरणाचा असा तो काळ , पण ती कातरवेळ मी कधी  अनुभवलीच नव्हती,     कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..!   तेव्हा ही स्वप्नाच्या देशात रमायचं माझ मन , मग मी जगायची त्यातला प्रत्येक क्षण, मग तिथून परतल्यावर कधीच कोणाची  आठवण झाली नव्हती कधी .. कारण ......, तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..! तेव्हा ही चालतच होते की जीवनाच्या वाटेवर एकटी,  कधी सुखात.., तर  कधी दुखात..,   पण तेव्हा सोबतीची गरज कधी भासलीच नव्हती , कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच  नव्हतास..! वर्षा पालकर  १२.०७.११.   

रिमझिम पावसाची सर,

Image
रिमझिम पावसाच्या सरी  गेल्या मनाला स्पर्शुनी  मनातल्या आठवणीचा,   मोर पिसारा फुलवूनि ...! पावसाच्या थेंबां थेंबात , तुझ्या स्पर्शाचा ओलावा ,   नकळत माझ्या मनी रुजला  , तुज्या मनातला  गारवा  ..! छेडून गेले पुन्हा एकदा  ते सूर पावसाचे नव्याने, मन माझे मोहरून गेले,  त्याच्या हरेक शब्दाने, चिंब भिजून गेले होते , धुंद तुझ्या  कवेमध्ये, आठवण  तुझी माझी अशी , आहे प्रत्येक थेंबामध्ये   ..., घन निळ्या नभावरी, दाटले काळे भोर मेघ , सुखावून गेली आज, ती पावसाची ओलि सर ...! भिजवते रोमा रोमातुनी , तुझ्या आठवणीची बरसात .. ! सुखावून गेली आज , पुन्हा ती खुळावलेली संध्याकाळ....!   वर्षा पालकर  १०.०७.११ 

काही क्षण...!

Image
  काही माणस भेटतात जीवनात, का? भेटतात  म्हणून विचारायचं नसत, काही धागे गुंततात हृदयात , म्हणून का ? गुंततात  असही म्हणायचं नसत,   काही क्षण हसरे असतात , ते पकडता येत नाहीत.  म्हणून रुसायचं नसत...., जीवन हे असच असत, हसत हसत जगायचं असत........!   वर्षा पालकर 

प्रिय ,

Image
प्रिय , रोजच्या सवयी प्रमाणेच तुला प्रिय म्हटलं पण माहित नाही तुला ते कितपत पटेल कारण तू माझासाठी तेव्हा जेवढा प्रिय होतास  तेवढाच आज ही आहेस असो.. आज या पत्रातून तुझ्याशी खूप बोलायचं आहे म्हणून तू वाचशील ना आठवत का तुला आपण एकमेकांना शेवटचे भेटलो होतो तेव्हा  खूप भांडण झाल होत मला वाटल होत की तू मागे वळून पाहशील पण तू शेवटच ही बघितलं नाहीस वळून मागे  खूप वाईट वाटत  तेव्हा खूप राग येत होता स्वताचा का अस झाल .....त्या दिवसापासून आज पर्यंत तुझ्या आठवणी शिवाय एक ही क्षण नाही गेला.... खुप वेळा मी माझा घरच्या ग्यालरीतून माझी लाडकी आराम खुर्ची, तिच्या लांब रुंद लटकणाऱ्या आयपोडवरची माझी सर्व आवडती गाणी ग्यालरीच्या बाहेरून घरात डोकावू पाहणार झाड, त्या झाडाच्या फांद्यामधून वितळत -वितळत हातांच्या तळव्यावर सांडणारा चंद्र ...सार आज उचकटून, फेकून द्यावास वाटतंय. रडावस वाटतंय, ओरडावस वाटतंय. पण बधीर झालेय मी! काहीच करता येत नाहीय. सुन्नपण माझायासकट व्यापून उरलंय . चंद्र हसत नाहीय , वारा  वाहता नाहीय ... तुला माहिती आहे का ? कारण तुझा आभास माझ्या आसपास...

मैत्री............ !

Image
अशी असते ती मैत्री... अशी असते ती मैत्री... मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणते आपल्याही मनाला जवळच करून ठेवते आपल्या सुख-दु:खात ती स्वत:ला सामावून घेते. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असाव लागत फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची साथ. वर्षा ०४.०७.११

आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो..

Image
आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो.. उरलेला सगळा वेळ आपण सांभाळन्यात घालवतो.. आणि जे जे सम्भाल्न्याचा प्रयत्न करतो ,  ते ते कायम निसटुन जात असते.. मुठीत धरलेल्या वालुसारख..  जितकी घट्ट मुठ आवळली तितकी टी निसटुन जाते... नाते सुध्हा तसेच.. जे होते ते चांगल्यासाठीच असते.. स्वतःच अस्तित्व विसरून दुसर्यान्मधे सुख पाहू नये क्षणा क्षणाला गरज भासवी इतक कोणाच्या जवळ कधी जाऊ नये त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करवणार नाही एवढ कोणाच्या प्रेमात खोल खोल बुडून जाऊ नये प्रेम करावे पण मोजुन मापून हिच सद्ध्या जगाची रित आहे साथ कोणाची असेल तर उत्तमच पण त्यासाठी याचक मात्र होऊ नये आपल्या साठी त्या अनमोल अस्तात दुसर्यांना त्यांचे काही महत्व नस्ते भावनांचा आपल्या स्वतःच बाजार असा मांडू नये....... वर्षा पालकर ०७.०२.११

आयुष्य ते काय?

Image
कधीतरी पहाटे एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून उठताना तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी, यासारखं सुख ते काय? कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी, आणि ती छॊटीशी जखम दिवसभर छळत रहावी, यासारखं दु:ख ते काय? कधीतरी रविवारी सगळं घर पसरलेलं, आणि दुपार नुसतं पडून आळसात घालवावी, यासारखी मजा ती काय? कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं, आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं, यासारखा आधार तो काय? कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध, आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेतंच समर्थन मिळावं, यासारखं बळ ते काय? कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावावं, आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजून सांगावं, यासारखं प्रेम ते काय? कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं, आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असं वाटावं, यासारखं समाधान ते काय? कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं, आणि जे हवं ते सर्व तू दिलंस असं म्हणता यावं, यासारखं आयुष्य ते काय? वर्षा पालकर २८.०७.१०

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव

Image
अश्रूंनाही   डोळ्यात   सजवायला   हव विझलेल्या   दिव्यांना   उजळायला   हव नाही   आठवले   शब्द   तरी   गीत   गायला   हव नसेल   जरी   खुष   तरी   हसायला   हव नको   समजूस   तुझ्याशीवाय   सुखी   आहे   मी जगासाठी   पण   खुष   दिसायला   हव अश्रूंनाही   डोळ्यात   सजवायला   हव पुन्हा   घेऊन   शपत   खोटीच  तू   भेटीस   आला  नाहीसच मजबुरी   असेल   तुझीही   काही खोटेच   मनाला   समजवायला   हव तडफडत असशील   तू   ही   भेटीसाठी स्वत : लाच   आता  बजवायला   हव अश्रूंनाही   डोळ्यात   सजवायला   हव तुटलेल्या   स्वप्नांना   कुरव   ळायला   हव नाही   जमत   तुझ्याशीवाय   तरी   जगायला   हव नसेल   जरी   सुखी   तरी   हसायला   हव नाही   भेटलास    सत्यात ...

सांग सख्या खरच सांग..कशी फुलेल आपली प्रित?

Image
एकमेकांचा निरोप घेतांना खुप् दुःखी होतो आपण लवकरच परत भेटायच असही ठरवल होत आपण अश्रूंना मोकळी वाट करुन खुप रडलो होतो अपण रडायच नाही असे ठरवत उगाचच खोट खोट हसलो होतो नात टिकवायच ठरवलय आपण आयुष्याच्या शेवटपय॔त माझाच राहशील का सख्या अखेरच्या श्वासापय॔त? सोबत आहे आपल्याला विश्वासाची अन् प्रेमाची पण मध्येच येते भिंत घरचांच्या प्रतिष्ठेची कदाचीत मला घरच्यांसाठी दुसरयाशी लग्न करावे लागेल माझ्या सव॔स्व असणारया तुला त्याच्यांसाठी दुःखवाव लागेल दुःखवूशकत नाही मी तुला म्हणून मरणाचा विचार करेल पण् तुझा विचार करताशनी आपोआप पाउल अडेल तुला तिलेल्या वचनांसाठी त्याच्या सोबत जगेन जगेन कस? जगण्यापेक्शा रोज तिळ तिळ मरेन तुझावर प्रेम असुनसुध्दा तुझा विरह सोसेल आठवणीवर जगताना रडतांनाही हसेल तरीही असेल ओढ मनात तुझ्या मिलनाची वाट पाहत असतील डोळे तुझ्या एका झलकची काय म्हणाव याला माझ्या प्रेमाची हार की जित सांग सख्या खरच सांग कशी फुलेल आपली प्रित? वर्षा पालकर  १८.०६.११

मला माहित होत......

Image
मला माहित होत हे असच होणार होत , दोन दिवसांसाठी आपलस करून सोडून जाणार होत , त्यासाठी तुला समजावल होत , तरीही तू माझ ऐकल नव्हत , तुझ्या विश्वासावर मी माझ घरट बांधल होत , पण ... पण ते घरटच उध्वस्त झाल होत , घरट उध्वस्त झाल्यामुले मन खुप रडत होत , तरीही डोळ्यांत पाणी तरळत नव्हत , तू सोडून गेला याच वाईट वाटत नव्हत , तुला नको म्हणताना तरीही तू माझ्या भावनांशी खेळला याच दू:ख मनात सलत होत , तुला याचा जाब विचारावा अस वाटत होत , पण जावुदे , माझच कुठेतरी चुकल होत , हो ती चुक म्हणजे ''तुझ्यासाठी '' उचललेल पाउल होत , कारन तू मला शेवटच्या श्वासपर्यंत साथ देन्याच वचन दिल होत , मला माहित होत हे असच होणार होत , खर तर ,,, खुप रडतय ..खुप रडतय... रे माझ मन कारण मी ही तुला मनापासून आपल मानल होत ... वर्षा पालकर २८.०७.११

पुन्हा एकदा मानसं च्या गर्दित,मला एक्ट करून गेलास...

Image
काल   जेव्हा   तू   अचानक   फ़ोन   केलास ... कशी   आहेस   म्हणालास ... खर   कस   सांगणार   होते .. मग   म्हणाले   मी   मजेत   आहे  ... ते   जाऊ   दे   तुझ   कस   चाललय  .. आजकाल   कामत   जरा   जास्तच   व्यस्त   आहे .. मग   बराच   वेळ   आपण   बोलत   होतो ... घरच्यान   बद्दल ,  ऑफिस   बद्दल ,  नविन   पाहिलेल्या   सिनेमा   बद्दल ...  अगदी   पूर्वी   सारख   हसत   हसत ...  मनात   चाललेले   वादल , कसे   बसे   डोळ्यात   थाम्बवत   होतो ...  एकमेकांच्या   मनाची , हळूच   चाहुल   घेत   होतो ..  तोलून   मापून   बोलण .. मी   कशी   आहे   याचा   हळूच   कानोसा   घेन .. दोघांनाही   ठाउक   होत   आपण   वर   वरच   हसतोय ..  समोरच्याला   कलु   नये ...

कस सांगू तुला मी..,"मी" आहे तरी कशी ?

कस  सांगू तुला मी..,"मी"  आहे तरी कशी ? कधी स्वतःमध्ये गुंतलेली तर कधी, लिखाणामध्ये अडकलेली....! कस  सांगू तुला मी..,"मी"  आहे तरी कशी ? एकांत च्या संगती मध्ये स्वताला रमवणारी  की मैत्रिणीच्या  घोळक्यात  स्वतःला हरवणारी... कस  सांगू तुला मी..,"मी"  आहे तरी कशी ?