रिमझिम पावसाची सर,
रिमझिम पावसाच्या सरी गेल्या मनाला स्पर्शुनी मनातल्या आठवणीचा, मोर पिसारा फुलवूनि ...! पावसाच्या थेंबां थेंबात , तुझ्या स्पर्शाचा ओलावा , नकळत माझ्या मनी रुजला , तुज्या मनातला गारवा ..! छेडून गेले पुन्हा एकदा ते सूर पावसाचे नव्याने, मन माझे मोहरून गेले, त्याच्या हरेक शब्दाने, चिंब भिजून गेले होते , धुंद तुझ्या कवेमध्ये, आठवण तुझी माझी अशी , आहे प्रत्येक थेंबामध्ये ..., घन निळ्या नभावरी, दाटले काळे भोर मेघ , सुखावून गेली आज, ती पावसाची ओलि सर ...! भिजवते रोमा रोमातुनी , तुझ्या आठवणीची बरसात .. ! सुखावून गेली आज , पुन्हा ती खुळावलेली संध्याकाळ....! वर्षा पालकर १०.०७.११