"एकटीच माझी मी..!




मी अशीच असते ,
कधीकधी एकटीच माझी मी हरवलेली  ,
गर्दीत भोवतीच्या, कुणीच नसत कधी ...,

येथे न कोणी राहिले, ओळखीचे अन न पाळखीचे,
होतात भास मजला, असेच कधीकधी ...,

जपते मनात माझ्या, असे हुंदके कधी कधी ,
लपवीत आसवे  ही हसते कधी कधी ...,

असच कधी मी हरवुन बसले माझीच मला मी 
आता नकोनकोशी वाटते माझीच मला मी … 


जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरीही,
उसवीत  खुणा  आठवते आज ही मला माझी मी ....!



वर्षा पालकर 
२१.१०.२०११

Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?