Posts

Showing posts from July, 2011

ती राधा बावरी....!

Image
काल तुझी आठवण नव्याने  खुलवून गेली,  माझ्या जगण्याला नवा आधार देवून गेली,  तुझ्या परतीच्या वाटेवर जणू,  प्राजक्ता बहरून गेली..., आज ही आठवतोय  मला,  आपल्या भेटीतला हरेक तो क्षण, अनोळखी रस्ते आणि अनोळखी आपण  तरी हि का वाटे एकमेकांची ओढ..,  तीच ती संध्याकाळ अन तीच ती रातराणी,  आज जणू ती नव्याने आली माझ्या दारी,  अंगणात नाचली सर्वत्र पसरली अन.  परत तेच परिमल  सोडून गेली माझ्या घरी, आज ही आहे त्या आठवणी संगतीला,  परत परत नव्याने जगायला लावायला,  तोही  कृष्ण सावळा अन मी ही राधा बावरी,  त्या नात्याला अंत न कधी जाहला.....!     वर्षा पालकर  २६.०७.११

स्वप्नाची दुनिया....सुंदर अन सुखद

Image
स्वप्नात येऊन हळूच डोळ्यांत दडून जा.., मी साद घालते तुला तू माझ्यात विरून जा..! वाटलं स्वप्नांवर लिहावं काहीतरी, पण स्वप्नात त्याच्या शिवाय कुणीच नाही..., स्वप्नं त्याचे नयन माझे मन माझे घर त्याचे..,   त्याची अशी सुंदर कल्पना..,  अस्पष्ट चेहरा, अन शांत सोबतीला  कोण आहे तो...? माहित नाही मला,  पण नेहमीच असतो सोबतीला,अन  स्वप्नान मधल्या एकांताला ..!  स्वप्नामध्ये तो मला फार आवडतो ,   त्याचा सहवास हवाहवासा वाटतो , तो क्षणात दिपतो  अन क्षणात विझतो ,   अस का वागतो तो...?  प्रश्न पडतो मग माझ्या मनाला..,  कळत नव्हते मजला  , काय झाले त्याला,  स्वप्नात येऊन म्हणाला मला.., सांग ना ? ग.. आवडतो का मी तुला..? मनाने होकार दिला,   ओठांची कुजबुज झाली,   नकळत  कोवळे उन डोळ्यांवर पडले, डोळ्यांची उघडझाप झाली अन.., स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडले अन,  वास्तवाच्या उजेडात  एकवटून  गे...

कारण....,तेव्हा तो माझ्या जीवनात आलाच नव्हता..!

Image
तेव्हा ही होताच की  गार पावसाळा..., रिमझिमनाऱ्या सरीचा अन, कोसळणाऱ्या धबधब्याचा..,! पण त्यातली  निशब्दता,  कधी  जाणवलीच नव्हती ..,  कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच  नव्हतास..! तेव्हा ही होतच होती की , रोज संध्याकाळ..,  रुपेरी किरणाचा असा तो काळ , पण ती कातरवेळ मी कधी  अनुभवलीच नव्हती,     कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..!   तेव्हा ही स्वप्नाच्या देशात रमायचं माझ मन , मग मी जगायची त्यातला प्रत्येक क्षण, मग तिथून परतल्यावर कधीच कोणाची  आठवण झाली नव्हती कधी .. कारण ......, तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..! तेव्हा ही चालतच होते की जीवनाच्या वाटेवर एकटी,  कधी सुखात.., तर  कधी दुखात..,   पण तेव्हा सोबतीची गरज कधी भासलीच नव्हती , कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच  नव्हतास..! वर्षा पालकर  १२.०७.११.   

रिमझिम पावसाची सर,

Image
रिमझिम पावसाच्या सरी  गेल्या मनाला स्पर्शुनी  मनातल्या आठवणीचा,   मोर पिसारा फुलवूनि ...! पावसाच्या थेंबां थेंबात , तुझ्या स्पर्शाचा ओलावा ,   नकळत माझ्या मनी रुजला  , तुज्या मनातला  गारवा  ..! छेडून गेले पुन्हा एकदा  ते सूर पावसाचे नव्याने, मन माझे मोहरून गेले,  त्याच्या हरेक शब्दाने, चिंब भिजून गेले होते , धुंद तुझ्या  कवेमध्ये, आठवण  तुझी माझी अशी , आहे प्रत्येक थेंबामध्ये   ..., घन निळ्या नभावरी, दाटले काळे भोर मेघ , सुखावून गेली आज, ती पावसाची ओलि सर ...! भिजवते रोमा रोमातुनी , तुझ्या आठवणीची बरसात .. ! सुखावून गेली आज , पुन्हा ती खुळावलेली संध्याकाळ....!   वर्षा पालकर  १०.०७.११ 

काही क्षण...!

Image
  काही माणस भेटतात जीवनात, का? भेटतात  म्हणून विचारायचं नसत, काही धागे गुंततात हृदयात , म्हणून का ? गुंततात  असही म्हणायचं नसत,   काही क्षण हसरे असतात , ते पकडता येत नाहीत.  म्हणून रुसायचं नसत...., जीवन हे असच असत, हसत हसत जगायचं असत........!   वर्षा पालकर 

प्रिय ,

Image
प्रिय , रोजच्या सवयी प्रमाणेच तुला प्रिय म्हटलं पण माहित नाही तुला ते कितपत पटेल कारण तू माझासाठी तेव्हा जेवढा प्रिय होतास  तेवढाच आज ही आहेस असो.. आज या पत्रातून तुझ्याशी खूप बोलायचं आहे म्हणून तू वाचशील ना आठवत का तुला आपण एकमेकांना शेवटचे भेटलो होतो तेव्हा  खूप भांडण झाल होत मला वाटल होत की तू मागे वळून पाहशील पण तू शेवटच ही बघितलं नाहीस वळून मागे  खूप वाईट वाटत  तेव्हा खूप राग येत होता स्वताचा का अस झाल .....त्या दिवसापासून आज पर्यंत तुझ्या आठवणी शिवाय एक ही क्षण नाही गेला.... खुप वेळा मी माझा घरच्या ग्यालरीतून माझी लाडकी आराम खुर्ची, तिच्या लांब रुंद लटकणाऱ्या आयपोडवरची माझी सर्व आवडती गाणी ग्यालरीच्या बाहेरून घरात डोकावू पाहणार झाड, त्या झाडाच्या फांद्यामधून वितळत -वितळत हातांच्या तळव्यावर सांडणारा चंद्र ...सार आज उचकटून, फेकून द्यावास वाटतंय. रडावस वाटतंय, ओरडावस वाटतंय. पण बधीर झालेय मी! काहीच करता येत नाहीय. सुन्नपण माझायासकट व्यापून उरलंय . चंद्र हसत नाहीय , वारा  वाहता नाहीय ... तुला माहिती आहे का ? कारण तुझा आभास माझ्या आसपास...

मैत्री............ !

Image
अशी असते ती मैत्री... अशी असते ती मैत्री... मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणते आपल्याही मनाला जवळच करून ठेवते आपल्या सुख-दु:खात ती स्वत:ला सामावून घेते. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असाव लागत फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची साथ. वर्षा ०४.०७.११

आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो..

Image
आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो.. उरलेला सगळा वेळ आपण सांभाळन्यात घालवतो.. आणि जे जे सम्भाल्न्याचा प्रयत्न करतो ,  ते ते कायम निसटुन जात असते.. मुठीत धरलेल्या वालुसारख..  जितकी घट्ट मुठ आवळली तितकी टी निसटुन जाते... नाते सुध्हा तसेच.. जे होते ते चांगल्यासाठीच असते.. स्वतःच अस्तित्व विसरून दुसर्यान्मधे सुख पाहू नये क्षणा क्षणाला गरज भासवी इतक कोणाच्या जवळ कधी जाऊ नये त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करवणार नाही एवढ कोणाच्या प्रेमात खोल खोल बुडून जाऊ नये प्रेम करावे पण मोजुन मापून हिच सद्ध्या जगाची रित आहे साथ कोणाची असेल तर उत्तमच पण त्यासाठी याचक मात्र होऊ नये आपल्या साठी त्या अनमोल अस्तात दुसर्यांना त्यांचे काही महत्व नस्ते भावनांचा आपल्या स्वतःच बाजार असा मांडू नये....... वर्षा पालकर ०७.०२.११