मैत्री............ !
अशी असते ती मैत्री...
मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री
मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणते
आपल्याही मनाला जवळच करून ठेवते
आपल्या सुख-दु:खात ती स्वत:ला सामावून घेते.
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असाव लागत
फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची साथ.
वर्षा
०४.०७.११

Comments