कारण....,तेव्हा तो माझ्या जीवनात आलाच नव्हता..!
तेव्हा ही होताच की गार पावसाळा..., रिमझिमनाऱ्या सरीचा अन, कोसळणाऱ्या धबधब्याचा..,! पण त्यातली निशब्दता, कधी जाणवलीच नव्हती .., कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..! तेव्हा ही होतच होती की , रोज संध्याकाळ.., रुपेरी किरणाचा असा तो काळ , पण ती कातरवेळ मी कधी अनुभवलीच नव्हती, कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..! तेव्हा ही स्वप्नाच्या देशात रमायचं माझ मन , मग मी जगायची त्यातला प्रत्येक क्षण, मग तिथून परतल्यावर कधीच कोणाची आठवण झाली नव्हती कधी .. कारण ......, तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..! तेव्हा ही चालतच होते की जीवनाच्या वाटेवर एकटी, कधी सुखात.., तर कधी दुखात.., पण तेव्हा सोबतीची गरज कधी भासलीच नव्हती , कारण...., तेव्हा तू माझ्या जीवनात आलाच नव्हतास..! वर्षा पालकर १२.०७.११.