ती राधा बावरी....!
काल तुझी आठवण नव्याने खुलवून गेली, माझ्या जगण्याला नवा आधार देवून गेली, तुझ्या परतीच्या वाटेवर जणू, प्राजक्ता बहरून गेली..., आज ही आठवतोय मला, आपल्या भेटीतला हरेक तो क्षण, अनोळखी रस्ते आणि अनोळखी आपण तरी हि का वाटे एकमेकांची ओढ.., तीच ती संध्याकाळ अन तीच ती रातराणी, आज जणू ती नव्याने आली माझ्या दारी, अंगणात नाचली सर्वत्र पसरली अन. परत तेच परिमल सोडून गेली माझ्या घरी, आज ही आहे त्या आठवणी संगतीला, परत परत नव्याने जगायला लावायला, तोही कृष्ण सावळा अन मी ही राधा बावरी, त्या नात्याला अंत न कधी जाहला.....! वर्षा पालकर २६.०७.११