प्रिय ,
प्रिय , रोजच्या सवयी प्रमाणेच तुला प्रिय म्हटलं पण माहित नाही तुला ते कितपत पटेल कारण तू माझासाठी तेव्हा जेवढा प्रिय होतास तेवढाच आज ही आहेस असो.. आज या पत्रातून तुझ्याशी खूप बोलायचं आहे म्हणून तू वाचशील ना आठवत का तुला आपण एकमेकांना शेवटचे भेटलो होतो तेव्हा खूप भांडण झाल होत मला वाटल होत की तू मागे वळून पाहशील पण तू शेवटच ही बघितलं नाहीस वळून मागे खूप वाईट वाटत तेव्हा खूप राग येत होता स्वताचा का अस झाल .....त्या दिवसापासून आज पर्यंत तुझ्या आठवणी शिवाय एक ही क्षण नाही गेला.... खुप वेळा मी माझा घरच्या ग्यालरीतून माझी लाडकी आराम खुर्ची, तिच्या लांब रुंद लटकणाऱ्या आयपोडवरची माझी सर्व आवडती गाणी ग्यालरीच्या बाहेरून घरात डोकावू पाहणार झाड, त्या झाडाच्या फांद्यामधून वितळत -वितळत हातांच्या तळव्यावर सांडणारा चंद्र ...सार आज उचकटून, फेकून द्यावास वाटतंय. रडावस वाटतंय, ओरडावस वाटतंय. पण बधीर झालेय मी! काहीच करता येत नाहीय. सुन्नपण माझायासकट व्यापून उरलंय . चंद्र हसत नाहीय , वारा वाहता नाहीय ... तुला माहिती आहे का ? कारण तुझा आभास माझ्या आसपास...