लाटेच असत एकच उद्दिष्ट , कसही करून किनाऱ्याला गाठाव , कीनाराल्याही नसेल का वाटत कधी लाटेकडे धावावं ? कदाचित वाटत असूनही त्याला ते शक्य नसाव , कारण आधार द्यायचं वचंन त्याच जमिनीशी पक्क असाव
काही क्षण...!
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
काही माणस भेटतात जीवनात,
का? भेटतात म्हणून विचारायचं नसत,
काही धागे गुंततात हृदयात ,
म्हणून का ? गुंततात असही म्हणायचं नसत,
काही क्षण हसरे असतात , ते पकडता येत नाहीत.
म्हणून रुसायचं नसत....,
जीवन हे असच असत,
हसत हसत जगायचं असत........!
वर्षा पालकर
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Comments
Popular posts from this blog
स्वप्न मनातले ......! शब्दांचे शब्दांशी, बहरलेल्या फुलांशी, हरेक त्या नात्याशी, हळव्या त्या मनाशी, हरवलेल्या क्षणाशी, जपलेल्या त्या नात्याशी, हरेक त्या आठवणीशी, स्वप्न मनातल प्रत्येकाने स्वतःचे स्वतःशी बांधलेलं एक अतूट नात्याशी ... स्वप्न मनातले - " आठवणीतल्या तिच्याशी ."
रिमझिम पावसाच्या सरी गेल्या मनाला स्पर्शुनी मनातल्या आठवणीचा, मोर पिसारा फुलवूनि ...! पावसाच्या थेंबां थेंबात , तुझ्या स्पर्शाचा ओलावा , नकळत माझ्या मनी रुजला , तुज्या मनातला गारवा ..! छेडून गेले पुन्हा एकदा ते सूर पावसाचे नव्याने, मन माझे मोहरून गेले, त्याच्या हरेक शब्दाने, चिंब भिजून गेले होते , धुंद तुझ्या कवेमध्ये, आठवण तुझी माझी अशी , आहे प्रत्येक थेंबामध्ये ..., घन निळ्या नभावरी, दाटले काळे भोर मेघ , सुखावून गेली आज, ती पावसाची ओलि सर ...! भिजवते रोमा रोमातुनी , तुझ्या आठवणीची बरसात .. ! सुखावून गेली आज , पुन्हा ती खुळावलेली संध्याकाळ....! वर्षा पालकर १०.०७.११
कधीतरी पहाटे एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून उठताना तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी, यासारखं सुख ते काय? कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी, आणि ती छॊटीशी जखम दिवसभर छळत रहावी, यासारखं दु:ख ते काय? कधीतरी रविवारी सगळं घर पसरलेलं, आणि दुपार नुसतं पडून आळसात घालवावी, यासारखी मजा ती काय? कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं, आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं, यासारखा आधार तो काय? कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध, आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेतंच समर्थन मिळावं, यासारखं बळ ते काय? कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावावं, आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजून सांगावं, यासारखं प्रेम ते काय? कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं, आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असं वाटावं, यासारखं समाधान ते काय? कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं, आणि जे हवं ते सर्व तू दिलंस असं म्हणता यावं, यासारखं आयुष्य ते काय? वर्षा पालकर २८.०७.१०
Comments