सांग सख्या खरच सांग..कशी फुलेल आपली प्रित?
एकमेकांचा निरोप घेतांना खुप् दुःखी होतो आपण लवकरच परत भेटायच असही ठरवल होत आपण अश्रूंना मोकळी वाट करुन खुप रडलो होतो अपण रडायच नाही असे ठरवत उगाचच खोट खोट हसलो होतो नात टिकवायच ठरवलय आपण आयुष्याच्या शेवटपय॔त माझाच राहशील का सख्या अखेरच्या श्वासापय॔त? सोबत आहे आपल्याला विश्वासाची अन् प्रेमाची पण मध्येच येते भिंत घरचांच्या प्रतिष्ठेची कदाचीत मला घरच्यांसाठी दुसरयाशी लग्न करावे लागेल माझ्या सव॔स्व असणारया तुला त्याच्यांसाठी दुःखवाव लागेल दुःखवूशकत नाही मी तुला म्हणून मरणाचा विचार करेल पण् तुझा विचार करताशनी आपोआप पाउल अडेल तुला तिलेल्या वचनांसाठी त्याच्या सोबत जगेन जगेन कस? जगण्यापेक्शा रोज तिळ तिळ मरेन तुझावर प्रेम असुनसुध्दा तुझा विरह सोसेल आठवणीवर जगताना रडतांनाही हसेल तरीही असेल ओढ मनात तुझ्या मिलनाची वाट पाहत असतील डोळे तुझ्या एका झलकची काय म्हणाव याला माझ्या प्रेमाची हार की जित सांग सख्या खरच सांग कशी फुलेल आपली प्रित? वर्षा पालकर १८.०६.११