Posts

Showing posts from June 16, 2022

❤❤"आई तुझविना मला कर्मत नाही "❤❤

Image
❤❤"आई तुझविना मला कर्मत नाही "❤❤ "तू नेहमी बोलायची, "मी नसल्यावर तुम्हला माझी किंमत कळणार" पण खरंच कधी अस स्वप्नात ही वाटलं नहोत जे त्या रात्री ८ मार्च २०२२ ची मध्य रात्र आमच्या साठी काळ रात्र ठरवि, एका रात्रीत होत्याच नहोत झाला, आणि आमची सावली आमच्या  जवळून निघून गेली.  त्या    एका रात्रीने आमचं जग आमची ताकद हिरावून घेतली, सर्व  इकडच तिकडं झालं, कधी कशी संधी साधली त्या वेळेने आणि आमची  शक्ती आमचा सर्वस्व असलेला आमची आई आम्हला काही न बोलता आमच्यातून निघून गेली,  त्या नियतीने तिला ही फसवलं आणि तिच्या वर चाहूल ही  न लागता तिला आमच्यापासून हिरावल. त्या दिवशी सर्व तर छान चाललं होत, बर्थडे होता तिचा तीही खुश होती आणि भावाचा लग्न ही  ठरलं म्हणून डबल खुश होती मग ?  असं सर्व चांगलं होत असताना दैवाने का अशी आमची आणि तिची ही का फसवणूक केली, का आमच्या आई ला आमच्यातून असा अर्ध्यावर घेऊन गेलास  का ? असा आमच्या आनंदात  विरजण पडलस,  तुला बघवल नाही का ते सुख तो आनंद, खरंच तू आहेस का  देवा ? ज्याच्यावर लोक देव म्हणून विश्वास...