"एकटीच माझी मी..!
मी अशीच असते , कधीकधी एकटीच माझी मी हरवलेली , गर्दीत भोवतीच्या, कुणीच नसत कधी ..., येथे न कोणी राहिले, ओळखीचे अन न पाळखीचे, होतात भास मजला, असेच कधीकधी ..., जपते मनात माझ्या, असे हुंदके कधी कधी , लपवीत आसवे ही हसते कधी कधी ..., असच कधी मी हरवुन बसले माझीच मला मी आता नकोनकोशी वाटते माझीच मला मी … जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरीही, उसवीत खुणा आठवते आज ही मला माझी मी ....! वर्षा पालकर २१.१०.२०११