स्वप्नाची दुनिया....सुंदर अन सुखद
स्वप्नात येऊन हळूच
डोळ्यांत दडून जा..,
मी साद घालते तुला
तू माझ्यात विरून जा..!
डोळ्यांत दडून जा..,
मी साद घालते तुला
तू माझ्यात विरून जा..!
वाटलं स्वप्नांवर लिहावं काहीतरी,
पण स्वप्नात त्याच्या शिवाय कुणीच नाही...,
स्वप्नं त्याचे नयन माझे
मन माझे घर त्याचे..,
पण स्वप्नात त्याच्या शिवाय कुणीच नाही...,
स्वप्नं त्याचे नयन माझे
मन माझे घर त्याचे..,
त्याची अशी सुंदर कल्पना..,
अस्पष्ट चेहरा, अन शांत सोबतीला
कोण आहे तो...? माहित नाही मला,
पण नेहमीच असतो सोबतीला,अन
स्वप्नान मधल्या एकांताला ..!
स्वप्नामध्ये तो मला फार आवडतो,
त्याचा सहवास हवाहवासा वाटतो,
तो क्षणात दिपतो अन क्षणात विझतो,
अस का वागतो तो...?
प्रश्न पडतो मग माझ्या मनाला..,
त्याचा सहवास हवाहवासा वाटतो,
तो क्षणात दिपतो अन क्षणात विझतो,
अस का वागतो तो...?
प्रश्न पडतो मग माझ्या मनाला..,
कळत नव्हते मजला ,काय झाले त्याला,
स्वप्नात येऊन म्हणाला मला..,
सांग ना ? ग.. आवडतो का मी तुला..?
मनाने होकार दिला, ओठांची कुजबुज झाली,
स्वप्नात येऊन म्हणाला मला..,
सांग ना ? ग.. आवडतो का मी तुला..?
मनाने होकार दिला, ओठांची कुजबुज झाली,
नकळत कोवळे उन डोळ्यांवर पडले,
डोळ्यांची उघडझाप झाली अन..,
स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडले अन,
वास्तवाच्या उजेडात एकवटून गेले..!
वर्षा पालकर
१४.०७.११
१४.०७.११

Comments