रिमझिम पावसाची सर,
रिमझिम पावसाच्या सरी
गेल्या मनाला स्पर्शुनी
मनातल्या आठवणीचा,
मोर पिसारा फुलवूनि ...!
पावसाच्या थेंबां थेंबात ,
तुझ्या स्पर्शाचा ओलावा ,
नकळत माझ्या मनी रुजला ,
तुज्या मनातला गारवा ..!
छेडून गेले पुन्हा एकदा
ते सूर पावसाचे नव्याने,
मन माझे मोहरून गेले,
त्याच्या हरेक शब्दाने,
चिंब भिजून गेले होते ,
धुंद तुझ्या कवेमध्ये,
आठवण तुझी माझी अशी ,
आहे प्रत्येक थेंबामध्ये ...,
घन निळ्या नभावरी,
दाटले काळे भोर मेघ ,
सुखावून गेली आज,
ती पावसाची ओलि सर ...!
भिजवते रोमा रोमातुनी ,
तुझ्या आठवणीची बरसात .. !
सुखावून गेली आज ,
पुन्हा ती खुळावलेली संध्याकाळ....!
वर्षा पालकर
१०.०७.११

Comments