प्रिय ,
प्रिय ,
रोजच्या सवयी प्रमाणेच तुला प्रिय म्हटलं पण माहित नाही तुला ते कितपत पटेल कारण तू माझासाठी तेव्हा जेवढा प्रिय होतास तेवढाच आज ही आहेस असो.. आज या पत्रातून तुझ्याशी खूप बोलायचं आहे म्हणून तू वाचशील ना आठवत का तुला आपण एकमेकांना शेवटचे भेटलो होतो तेव्हा खूप भांडण झाल होत मला वाटल होत की तू मागे वळून पाहशील पण तू शेवटच ही बघितलं नाहीस वळून मागे खूप वाईट वाटत तेव्हा खूप राग येत होता स्वताचा का अस झाल .....त्या दिवसापासून आज पर्यंत तुझ्या आठवणी शिवाय एक ही क्षण नाही गेला....
खुप वेळा मी माझा घरच्या ग्यालरीतून माझी लाडकी आराम खुर्ची, तिच्या लांब रुंद लटकणाऱ्या आयपोडवरची माझी सर्व आवडती गाणी ग्यालरीच्या बाहेरून घरात डोकावू पाहणार झाड, त्या झाडाच्या फांद्यामधून वितळत -वितळत हातांच्या तळव्यावर सांडणारा चंद्र ...सार आज उचकटून, फेकून द्यावास वाटतंय. रडावस वाटतंय, ओरडावस वाटतंय. पण बधीर झालेय मी! काहीच करता येत नाहीय. सुन्नपण माझायासकट व्यापून उरलंय .
चंद्र हसत नाहीय , वारा वाहता नाहीय ... तुला माहिती आहे का ? कारण तुझा आभास माझ्या आसपास कुठेच नाहीय आहे. सारच संपलय, नाही ते जाणून बुजून संपवलंय पर्याय काही नहोता ते संपवण्याशिवाय ....कडवट पणा दाटून आलाय मनात, जिभेवर खारट- कडवट चव रेंगगळताहेत . त्यापासून पळून जायचंय पण जाता येत नाही . किती दिवस असे मोजत राहायचे . तुझ माझ शेवटचा बोलन होवून किती दिवस झालेत ? बोलन बंद करायचं , पूर्णविराम द्यायचा अस ठरवून किती दिवस झालेत ? आत्ता ते मोजावास वाटतंय हे दिवस .. बधीर पण . टोकाची फीलींग्ज यामध्ये इकडून -तिकडे फेकली जाते मी. खर तर तुझ्या जवळ असण्याची सवय लागली होती मला सवय नाही व्यसनच म्हण आणि त्याच व्यसनाचे परिणाम आहेत हे सर्व ते व्यसन सुटता सुटत नाही आहे. एक महिन्या साठी साठी जवळ आलो होतो आपण नि आत्ता का अवघड होवून बसलंय तुझ्यापासून दूर जाणं? माझ्या आयुष्यात तू नाहोतास तेव्हाही मी आनंदात होते की ! मग आत्ता तर वजा झालास या जगण्यातून तर का घुसमट होते माझी ?
दिवस जोतो. संपतो सुद्धा. सूर्य अस्ताला टेकतो . सर्व काही नेहमी होत पण माझा दिवस कुटून सुरवात होवून कुठे संपतो याच हल्ली डायरीत येन ही बंद झालाय. सर्व काही बदलय समोरचा कॉम्पुटर . इंटरनेट, आजुबाजुच्यायचं बोलन -हसन, टवाळक्या यामध्ये दिवस बुडून जातो. कधी हे नसेल... तेव्हा मोबाईलच्या गेम मध्ये वेळ संपून जातो. दिवसभर अस तुझ अस्तित्व आजूबाजूला असण्याच जाणवत ही नाही . पण हातातल्या मोबाईलवर दिवसभर येणारे फोन संध्याकाळ होताना दमून जातो. आणि तो फोन ही एकटा पडल्यासारखा दिसतो. दिवसभरात तुझ नाव खुपदा टाईप होत दोन तीन शब्द लिहून ते लगेच डीलीट ही होतात . क्षणभर वाईट वाटत पण हे सार संपलय हे लक्षात आल्यवर पावलं पुन्हा घरच्या वाटेने वळतात आणि मग मात्र सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा कठीण वाटू लागतात. आणि मग मात्र तो संपूर्ण दिवस गुडुप्प होवून जातो . मनातल्या वादळाला थांबून ठेवावास वाटत पण ते हे शक्य होत नाही कारण तू समोर नसतानाही तुझा आठवणीने त्यावर आधीच कब्जा केलेला असतो त्यावेळी मात्र तुझ्या शिवाय काहीच उमगत नाही तू समोर असल्याचा आभास सतत होतो. ट्रेन मधल्या गर्दी मध्ये सुद्धा मुली फोनवर बोलत असतात, हसत असतात, तेव्हा मात्र आलेल्या फोन ला हे रेसिव करायचं भान राहत नाही त्याना हसताना बघून स्वताच्या फोन कडे बघत नुसतच आठवणी मध्ये विरून जाते. तुझाशी बोलावस वाटत असत आणि दिवस भरतल सर्व सांगायचं असत पण तुझा नो डायल करून परत डिसकॅनेकठ करून स्वताला पुस्तकांच्या पानामध्ये किवा एखाद्या पेपर मध्ये गुंतवून बसते. तुझा आठवणीच वादळ स्थिर होई पर्यंत स्वताला पुस्तकात खुपसून घेते. हे सर्व करत असताना खूप रडू येत पण ते आवरण्याचा अतोकाठ प्रयत्न करते आणि ट्रेन मधून उतरल्यावर घराकडे पावलं फहरपटत नेताना रडत असते मग कशाची हे परवा नसते कुणी आपल्याला रडत असताना बघेल का याची ही जाणीव राहत नाही खूप मोठ्याने रडता येत नाही म्हणून मग त्या चंद्राशी बोलते , हातावरच्या रेशामध्ये तुला शोधात असते पण तू तिथे नाहीच दिसत.
खर तर तुझी जागा दुसर कोणीच घेवू शकत नाही. तुझासारख सांगणार ही कुणीच नाही की घरी लवकर जा फिरण बस झाला आत्ता सरळ घरी जा....अस ओरडणार तू माझा सोबत नाही आहेस याची जाणीव होवून मग माझी मीच घरी जाते. उसन हसू ,उसनं आव नि उसना उसाह, घरच्या दारावर आल्यावर माझ्या चेहऱ्यावर आपोआप येतो कुठून देव जाणे ! पण खऱ्या माणसांसमोर खोट जगण्याचा बळ येत माझ्यात . मी खोटी हसते . आनंदी राहण्याचा प्रयत्न करत राहते ...सारे आजूबाजूला असेपर्यंत बागडत राहते हे सर्व खोट खोट करे पर्यंत खूप थकून जाते वाटत बस झाल सर्व थांबवावं सार खोटा मुखवटा फेकून द्यावा पण परत मोबोईल ची रिंग वाजली की परत तुझाच भास होतो वाटत तुझाच एस एम एस आला असावा किवा तुझा फोन आल्याचा भास होतो आणि मग खूप वेळा तुझा नंबर डायल करून डीस कनेक्ट करते खूप वेळा त्याकडे बघून तो नंबर सेव करावासा वाटतो खूप वेळा तो नंबर सेव करून एडीट होतो पण तुझा पर्यंत माझा हाकेचा इवला सूर हे पोचत देत नाही.. खूप वेळा तुला भेटण्याचा ही इच्छा होते पण स्वताचा इगो मधेच आड येतो वाटत......
जिथे ते सोडलं ते तिथेच राहूदे अस मोठ्याने कोणी तरी आरडा ओरडा करून सांगत असत कानात मग त्या आवाजच मी ऐकते आणि झोप यावी म्हणून टी व्ही चा चानल सर्फिग करत बसते डोळे थकतात पण तरी हि झोप येत नाही तुझी आठवण येवून खूप रडू येत राहत आणि अशा वेळी माझा टेडी मग अधिकच जवळ घेवून रडायचा प्रयत्न करते . पण खूप मोठ्यानं ओक्सा बोक्सी होवून नाही रडता येत पण..... कधी कधी वाटत अस कुढत राहण्यापेक्षा संपून टाकाव सर्व पण अस सर्व संपवून टाकण्याने हातावरच्या रेषा नाही बदलता येत ना...! मधेच कधी तरी झोप लागली तर स्वप्नात ही तुझ येतोस.. रोजच्या जगण्यातून तर नाहीच जात कधी आणि स्वप्नातून हे नाहीजात आहेस...का अस करतोस का अस मेलेल्या मनाला मारतोस अस जाप तुला विचारावासा वाटतो पण नाही होत तेवढी हिम्मत.
एकदा आपल्या कॉमन मित्राला विचारल "मला जशी त्याची आठवण येते तशीच त्याला ही येते कारे माझी आठवण ? मला जस त्याला भेटण्याची इच्छा होते तशीच त्याला हि होते का ? तो म्हणाला , " कदाचित त्यानेही हा प्रश्न विचारला असेलच ना कुणाला तरी .."
ते उत्तर ऐकून तुझासोबत नाही पण तुझा मनात तरी जिवंत राहण्याची अशा वाटली आणि मला परत एकदा जगावस वाटत निदान तुझा मनातल्या आठवणी साठी तरी .......!
तुझीच
वर्षा पालकर
११.०२.२०११

Comments