पुन्हा एकदा मानसं च्या गर्दित,मला एक्ट करून गेलास...


काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास...
कशी आहेस म्हणालास...खर कस सांगणार होते..
मग म्हणाले मी मजेत आहे ...ते जाऊ दे तुझ कस चाललय ..
आजकाल कामत जरा जास्तच व्यस्त आहे..
मग बराच वेळ आपण बोलत होतो...
घरच्यान बद्दलऑफिस बद्दल
नविन पाहिलेल्या सिनेमा बद्दल... 
अगदी पूर्वी सारख हसत हसत... 
मनात चाललेले वादल,कसे बसे डोळ्यात थाम्बवत होतो... 
एकमेकांच्या मनाची,हळूच चाहुल घेत होतो.. 
तोलून मापून बोलण..
मी कशी आहे याचा हळूच कानोसा घेन..
दोघांनाही ठाउक होत आपण वर वरच हसतोय.. 
समोरच्याला कलु नये..म्हणुन नाटक करतोय.. 
मग मधेच थाम्ब्लास,थोड्या वेळाने म्हणालास..
लग्नाची तारीख ठरली.. 
हॉल ठरला,अजुन ही बरीच काम पेंडिंग आहेत..
पण घरचे सगले खुश आहेत.. 
मग हळूच म्हणालास येशील 
माझ्यासाठी दिवस तूझा राखशील 
मी म्हणाले नक्कीच येइन,इयर एंड आहे पण प्रयत्न तरी करीन 
मग कधीतरी तू फ़ोन ठेउन दिलास
आणि पुन्हा एकदा मानसं च्या गर्दित,मला एक्ट करून गेलास...

वर्षा पालकर 
०७.०५.११

Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?