कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम..???
मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते,
अनोळखी ही मैत्री मनात घर करून जाते,
तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो,
मनात विचारांचा कल्लोळ चालू असतो ,
त्या नात्यातला गंध काही कळतच नाही,दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास,त्या नात्यामध्ये अचानक आपलेपणा वाटतो, रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं,
जोड्या स्वर्गात बनतात, कित्येकांचे स्वप्न साकारतात, मी ही आज त्याच वाटेवर चालते , कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम,

चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,
पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,
पाउले वेगळ्या दिशेने चालतात,
पण मन काही वळतच नाही,
कधी जर नाही काढली त्याने आठवण तर होतो त्रास,
सतत मन त्याचीच आठवण काढ़त,
जसं माझ्यासाठी तो आणि तिच्यासाठी मीच असणे,
कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,
त्या निरागस भावना अशाच कुठेतरी गुंततात ,
तर काही मेणा सारखे वितळतात ,
माझ्या भावना अशा शब्दात मांडते,
म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतेय....
"खरच याला प्रेम म्हणावा की प्रेम ?
"खरच याला प्रेम म्हणावा की प्रेम ?
वर्षा पालकर
१०.०४.२०१२

Comments