कोणीतरी आपलं असावं..!
चालता-चालता लागली ठेच तर,
दगड बाजूला सारण्यासाठी,
कोणीतरी आपलं असावं..,
अश्रू दुखाचे अन आनंदाचे,
देण्यास अन घेण्यास,
कोणीतरी आपलं असावं..!
हृदयाच्या पाकळ्या कोमेजताना,
फुलविण्यास त्या पुन्हा ,
कोणीतरी आपलं असावं..!
जीवनातील निराशेला,
न दुखावता हसवणार,
कोणीतरी आपलं असावं..!
कच्चे धागे प्रेमाचे,
हळुवार जपणार,
कोणीतरी आपलं असावं....!
वर्षा पालकर
Comments