Posts

**मनवेध** (Heart’s Reflection)

स्वप्न मनातले ......! शब्दांचे शब्दांशी, बहरलेल्या फुलांशी, हरेक त्या नात्याशी, हळव्या त्या मनाशी, हरवलेल्या क्षणाशी, जपलेल्या त्या नात्याशी, हरेक त्या आठवणीशी, स्वप्न मनातल प्रत्येकाने स्वतःचे स्वतःशी बांधलेलं एक अतूट बंधाचे... स्वप्न मनातले !!!!!
Image
स्वप्न मनातले ......! शब्दांचे शब्दांशी, बहरलेल्या फुलांशी, हरेक त्या नात्याशी, हळव्या त्या मनाशी,  हरवलेल्या क्षणाशी, जपलेल्या त्या नात्याशी, हरेक त्या आठवणीशी, स्वप्न मनातल प्रत्येकाने स्वतःचे स्वतःशी बांधलेलं एक अतूट  नात्याशी  ... स्वप्न मनातले - "  आठवणीतल्या तिच्याशी ."

❤❤"आई तुझविना मला कर्मत नाही "❤❤

Image
❤❤"आई तुझविना मला कर्मत नाही "❤❤ "तू नेहमी बोलायची, "मी नसल्यावर तुम्हला माझी किंमत कळणार" पण खरंच कधी अस स्वप्नात ही वाटलं नहोत जे त्या रात्री ८ मार्च २०२२ ची मध्य रात्र आमच्या साठी काळ रात्र ठरवि, एका रात्रीत होत्याच नहोत झाला, आणि आमची सावली आमच्या  जवळून निघून गेली.  त्या    एका रात्रीने आमचं जग आमची ताकद हिरावून घेतली, सर्व  इकडच तिकडं झालं, कधी कशी संधी साधली त्या वेळेने आणि आमची  शक्ती आमचा सर्वस्व असलेला आमची आई आम्हला काही न बोलता आमच्यातून निघून गेली,  त्या नियतीने तिला ही फसवलं आणि तिच्या वर चाहूल ही  न लागता तिला आमच्यापासून हिरावल. त्या दिवशी सर्व तर छान चाललं होत, बर्थडे होता तिचा तीही खुश होती आणि भावाचा लग्न ही  ठरलं म्हणून डबल खुश होती मग ?  असं सर्व चांगलं होत असताना दैवाने का अशी आमची आणि तिची ही का फसवणूक केली, का आमच्या आई ला आमच्यातून असा अर्ध्यावर घेऊन गेलास  का ? असा आमच्या आनंदात  विरजण पडलस,  तुला बघवल नाही का ते सुख तो आनंद, खरंच तू आहेस का  देवा ? ज्याच्यावर लोक देव म्हणून विश्वास...

स्वप्न मनातले ......!

Image
जपलेल्या त्या नात्याचे   , हर   एक   त्या   आठवणीचे ,   स्वप्न मनातले   , मनाने मनाशी बांधलेल्या त्या ,   अतूट त्या   बंधाचे   , अन गोड गुलाबी नात्याचे   .., शब्दांचे शब्दांशी , मनातल्या भावनाशी ,   बहरलेल्या   फुलांचे , फुलावरच्या भूग्यांशी ,     हरेक त्या नात्याशी , हळुवार त्या स्पर्शाचे , दाटलेल्या त्या धुक्यात गोड गुलाबी   थंडीचे स्वप्न मनातले तनामनात बहरलेल्या हरेक त्या   उणीवानचे   ............ स्वप्न मनातल अधुऱ्या त्या   सोबतीचे ......, अन सोबतीतल्या उणीवाचे स्वप्न मनातले ........!!!!!         वर्षा पालकर   ०१ . १२ . ११

आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो..

Image
आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो .. उरलेला सगळा वेळ आपण सांभाळन्यात घालवतो .. आणि जे जे   सांभाळण्याचा    प्रयत्न करतो ,  ते ते कायम निसटुन जात असते .. मुठीत धरलेल्या वाळु सारख ..  जितकी घट्ट मुठ आवळली तितकी टी निसटुन जाते ... नाते सुध्हा तसेच .. जे होते ते चांगल्यासाठीच असते .. स्वतःच अस्तित्व विसरून दुसर्यान्मधे सुख पाहू नये क्षणा क्षणाला गरज भासवी इतक कोणाच्या जवळ कधी जाऊ नये त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करवणार नाही एवढ कोणाच्या प्रेमात खोल खोल बुडून जाऊ नये प्रेम करावे पण मोजुन मापून हिच सद्ध्या जगाची रित आहे साथ कोणाची असेल तर उत्तमच पण त्यासाठी याचक मात्र होऊ नये आपल्या साठी त्या अनमोल अस्तात दुसर्यांना त्यांचे काही महत्व नस्ते भावनांचा आपल्या स्वतःच बाजार असा मांडू नये ....... वर्षा पालकर  
स्वप्न मनातले ......! शब्दांचे शब्दांशी, बहरलेल्या फुलांशी, हरेक त्या नात्याशी, हळव्या त्या मनाशी, हरवलेल्या क्षणाशी, जपलेल्या त्या नात्याशी, हरेक त्या आठवणीशी, स्वप्न मनातल प्रत्येकाने स्वतःचे स्वतःशी बांधलेलं एक अतूट बंधाचे... स्वप्न मनातले !!!!!  पुन्हा ओढ त्याच भेटीची….   " पुन्हा ती भेट "   

मनातल वारूळ ! तुझा विना

Image
का ???????  या एकाच शब्दावर खूप काहूर  माजलय मनात ............ आणि त्या भोवती असंख्य का ?? जमा झालेत  इतके की एखाद्या धुळीकणा सभोवती  वारूळ उभ रहाव ना रानात तस्सच! दिवसेंदिवस वाढत चाललेय बघ  त्या वारुळाची उंची ! आणि त्या का? च उत्तर  फक्त तुझ्याकडेच ............ मग फक्त एकदाच उत्तर देऊन टाक की  का ???????? च  आणि नसेल द्यायचं उत्तर ना ? तर तो का? तेव्ह ढा घेऊन जा  जाताना बरोबर तूच ............. मग वारूळ ही विरेल आपोआप  मनातल ............!!!    वर्षा पालकर