❤❤"आई तुझविना मला कर्मत नाही "❤❤
❤❤"आई तुझविना मला कर्मत नाही "❤❤
"तू नेहमी बोलायची, "मी नसल्यावर तुम्हला माझी किंमत कळणार" पण खरंच कधी अस स्वप्नात ही वाटलं नहोत जे त्या रात्री ८ मार्च २०२२ ची मध्य रात्र आमच्या साठी काळ रात्र ठरवि, एका रात्रीत होत्याच नहोत झाला, आणि आमची सावली आमच्या जवळून निघून गेली.
त्या एका रात्रीने आमचं जग आमची ताकद हिरावून घेतली, सर्व इकडच तिकडं झालं, कधी कशी संधी साधली त्या वेळेने आणि आमची शक्ती आमचा सर्वस्व असलेला आमची आई आम्हला काही न बोलता आमच्यातून निघून गेली, त्या नियतीने तिला ही फसवलं आणि तिच्या वर चाहूल ही न लागता तिला आमच्यापासून हिरावल.
त्या दिवशी सर्व तर छान चाललं होत, बर्थडे होता तिचा तीही खुश होती आणि भावाचा लग्न ही ठरलं म्हणून डबल खुश होती मग ?
असं सर्व चांगलं होत असताना दैवाने का अशी आमची आणि तिची ही का फसवणूक केली, का आमच्या आई ला आमच्यातून असा अर्ध्यावर घेऊन गेलास का ? असा आमच्या आनंदात विरजण पडलस, तुला बघवल नाही का ते सुख तो आनंद, खरंच तू आहेस का देवा ? ज्याच्यावर लोक देव म्हणून विश्वास ठेवतात आणि सकाळी उठून पहिला तुला वंदन करतात , मला तुझावर कधीच विश्वास नाही आहे आणि नाहोत फक्त एक कल्पना आहे कि देव आहे आणि ती व्यर्थ ज्याला काही अर्थ नाही अशी कल्पना आहे. तू एवढा आमच्या सोबत वाईट का वागलास नाही घ्यावस वाटत तुझा नाव ओठी वाटत जेव्हा तू आमच्या आईला ला आमच्यातून घेऊन गेलास तेव्हा तुझावरचा विश्वास तिथेच संपला देव जगात नसतो हेच कर आहे. ज्याच्यावर आम्ही फक्त विश्वास ठेवतो कि देव सर्व नीट करतो पण हेय सर्व फेक आहे खोट आहे . एकाच सत्य आहे कि " आई म्हणजे देव आहे" आणि तिच्याशिवाय या जगात कुणीच नाही. पण खरंच आई तुझाशिवाय जग खूप शांत आहे. ही शांतता नाही सहन होत, प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते आणि डोळ्यातून आपसूक पाणी वाहत, तू हवी होतीस आम्हला प्लीज परत ये आम्ही तुझी वाट पहातोय जे काही चुकलं ते सर्व परत नीट करतो पण तू परत ये...... .
" तुझा विना आई मला कर्मत नाही ".
Copy writes by
VK

Comments