आभासातील तू.....!!




आभासातील प्रिया तुझा भास,
मला किती सुखावून जातो,
तुझ्या माझ्यातल्या अंतराला,
माझ्या नकळत मिटवून जातो.. 

ऋण बंध हे आपुले जन्मोजन्मीचे,
तरीही हा दुरावा  का छळून जातो,
तुझ्या  त्या हळुवार स्पर्शाने मन   हे वेडे  ,
आनंदच्या पावसात भिजून जाते.… 

डोळ्यांना आता या माझ्या जणू ,
तुझाच  भास होतो ,  
क्षणात  हसू अन क्षणात रडू जणू 
मन   कासावीस होत  मग   
काळीजही बघ ठोका चुकतो .… 

मन हे माझ वेड पाखरू जणू ,
तुझ्या आठवणींत रमून जात,
तुला अन् तुलाच वेड्यागत, 
दैवाकडे माझ्या मागत राहत.

नको असा  दूर जावूस 
स्वप्नांना पायदळी तुडवून,
काळजाचे माझ्या तू, असे 
तुकडे तुकडे करून.....!

वर्षा पालकर 
२३.०६.११

Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?