रिमझिम पावसाची सर,


रिमझिम पावसाच्या सरी 
गेल्या मनाला स्पर्शुनी 
मनातल्या आठवणीचा,  
मोर पिसारा फुलवूनि ...!

पावसाच्या थेंबां थेंबात ,
तुझ्या स्पर्शाचा ओलावा ,  
नकळत माझ्या मनी रुजला  ,
तुज्या मनातला  गारवा  ..!

छेडून गेले पुन्हा एकदा 
ते सूर पावसाचे नव्याने,
मन माझे मोहरून गेले, 
त्याच्या हरेक शब्दाने,

चिंब भिजून गेले होते ,
धुंद तुझ्या कवेमध्ये,
आठवण  तुझी माझी अशी ,
आहे प्रत्येक थेंबामध्ये   ...,

घन निळ्या नभावरी,
दाटले काळे भोर मेघ ,
सुखावून गेली आज,
ती पावसाची ओलि सर ...!

भिजवते रोमा रोमातुनी ,
तुझ्या आठवणीची बरसात .. !
सुखावून गेली आज ,
पुन्हा ती खुळावलेली संध्याकाळ....!  

वर्षा पालकर 
१०.०७.११ 

Comments

Suhas Birhade said…
रिमझिम पावसाची सर..वाचताना आठवणींचा पाउस पुन्हा बरसत होता. मन प्रफुल्लीत झालं. छान लिहिलयस वर्षा..

Popular posts from this blog

आयुष्य ते काय?